नाट्यीकरण " स्पर्धेत शिरोळ तालुका"जिल्ह्यात द्वितीय" उर्दू खिद्रापूर ने केले नेतृत्व
जेडी न्यूज नेटवर्क दतवाड
कोल्हापूर :जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभाग प्राथमिक यांचे वतीने सोमवार दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा 2022-23 मध्ये उर्दू विद्यामंदिर खिद्रापूर ने सलग तिसऱ्या वर्षी शिरोळ तालुक्याचे नेतृत्व करीत आपले "नाट्यीकरण" सादर करुन जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावित शिरोळ तालुक्याचे नाव जिल्ह्यात लौकिक करीत कला,क्रीडा,सांस्कृतिक, विज्ञान प्रदर्शन,प्रज्ञाशोध व शिष्यवृत्ती स्पर्धांमध्ये आपल्या यशाची परंपरा अबाधित ठेवली आहे.
कारगीलसारख्या धगधगत्या तणावपूर्ण सीमेवर सैनिक म्हणून काम करणारा तरुण आपल्या आजारी आईला भेटण्याच्या ओढीने घरी पोहोचतो;पण त्याआधीच त्याची आई हे जग सोडून गेलेली असते. सैनिकाच्या मनातील देशप्रेम व आईबद्दलची ओढ असा भावविभोर करणारा प्रसंग या नाटकातून उर्दू विद्यामंदिर खिद्रापूरच्या विद्यार्थ्यांनी अतिशय भावनिक पद्धतीने प्रेक्षकांसमोर ठेवला व प्रेक्षकांचे अश्रू अनावर झाले.
बाल कलाकार म्हणून मिफ्ताह जमादार, आरिफा जमादार, आफिरा घुणके, मिस्बाह मुजावर, सिद्दीका बारिगड्डी,सबा इंजने व मुस्तकीम घुणके यांनी आपली कला सादर केली.यासाठी शाळेचे मुख्याध्यापक नाजिम जमादार,मार्गदर्शक शिक्षक आसिफ मुजावर,अंजुमारा बुखारी,बुशेरा पटेल,मोहसीन जमादार, मोअजम चौगुले,मदनकुमार कांबळे,दिलीप शिरढोणे,केंद्रप्रमुख रियाजअहमद चौगले,उर्दू विस्तार अधिकारी श्री. मुसा सुतार,सांस्कृतिक विभाग प्रमुख व पंचायत समिती शिरोळचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री.अनिलओमासे, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शिरोळचे श्री.दिपक कामत यांचे मार्गदर्शन लाभले. संगीत हरी मोरे व कृष्णात देसाई यांनी दिले.
No comments