Breaking News

सीबीएस वर गारगोटी मार्गावरील प्रवाशांसाठी आसन व्यवस्था उपलब्ध करावी..* * पुजारी यांची मागणी*

जे डी   nesw 



                          प्रशांत पुजारी 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या कोल्हापूर येथील मुख्य बसस्थानक (सीबीएस) येथे गारगोटी मार्गावर जाणाऱ्या प्रवाशासाठी कायमची आसन व्यवस्था व प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे बाबत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे मा सदस्य व अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पदाधिकारी श्री प्रशांत शरद पुजारी यांनी मागणी केली आहे.


कोल्हापूर ते गारगोटी, कोल्हापूर ते मुरगुड, कोल्हापूर ते मुदाळ तिट्टा मार्गे राधानगरी तसेच कोल्हापूर ते या मार्गावरील इतर मधली गावे या ठिकाणी सध्या एसटी बसेसच्या दररोज कमीत कमी 100 ते 150 फेऱ्या होतात. परिणामी फक्त या मार्गावर एसटीला दररोज लाखोंचे उत्पन्न मिळते. एस टी साठी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात हा गारगोटी मार्ग अत्यंत किफायतशीर आहे. त्याचबरोबर आदमापूर येथील श्री बाळूमामा देवालयाला जाण्यासाठी राज्याच्या विविध भागातून दर अमावस्येच्या यात्रेला हजारोंच्या संख्येने तसेच इतर दिवशीही अनेक भाविक जात असतात. परंतु या फायदेशीर असणाऱ्या मार्गावर रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कोल्हापूर येथील मध्यवर्ती बस स्थानकावर मात्र प्रचंड गैरसोय होत आहे. या मार्गावरील प्रवाशांच्यासाठी आसन व्यवस्था व प्लॅटफॉर्म नसल्याने लहान मुले, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, तरुण लोक, नोकरदार, व्यावसायिक तसेच शेकडो भाविक, आजारी लोकाना उन्हात, थंडीत, पावसात तेथील एका झाडाखाली एसटीची वाट बघत उभे राहावे लागते. या मार्गावर धावणाऱ्या एसटी गाड्याही त्याच झाडाखाली थांबवल्या जातात. एसटी कर्मचाऱ्यांनी निकामी एसटीचा काही भाग कापून त्या झाडाखाली स्वतःसाठी छोटे शेड मारून घेतले आहे. म्हणजे एस टी विभागाने स्वतःची सोय करून ज्यांच्यामुळे त्यांच्या आयुष्यात रोजीरोटीची सोय होते त्या प्रवासी ग्राहकांना मात्र वाऱ्यावर सोडले आहे. वृद्ध, आजारी, लहान मुले, महिला, शिवाय दिवसभर नोकरी व्यवसाय करून दमून गेल्यानंतर नोकरदार व्यवसायिकांना स्टॅंडवर आल्यावर विसावा मिळत नाही. पर्याय नसल्याने या सर्वांना तेथील झाडाखाली निमुटपणे तासन तास गाडीची वाट बघत उभे राहावे लागते. म्हणून गारगोटी मार्गावरील प्रवाशांसाठी त्यांच्या हक्काचे आसन व्यवस्था व प्लॅटफॉर्म त्वरित उपलब्ध करून देण्याबाबत मा श्री प्रशांत पुजारी यांनी आग्रहाची मागणी केलेली आहे.


याबाबतची पत्रे त्यांनी भागातील आमदार श्री प्रकाश आबिटकर, पुणे येथील प्रादेशिक व्यवस्थापक, कोल्हापूर येथील डिविजनल कंट्रोलर व गारगोटी डेपो व्यवस्थापक यांना पाठवली असून या अत्यंत गरजेच्या विषयाला वाचा फोडल्याने श्री प्रशांत पुजारी यांनी केलेल्या या मागणीचे या रुटवरील समस्त प्रवासी वर्गाकडून स्वागत व कौतुक होत आहे.

======================

No comments