Breaking News

जिल्हा परिषद शाळा नंबर 3 बेघर वसाहत अकिवाटच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा*

जेडी न्यूज नेटवर्क दत्तवाड


अकिवाट

               अकिवाट येथील शिरगांवे मळा,बेरड वसाहत व बसवेश्वर नगरमधील 'जिल्हा परिषद शाळा नं 3बेघर वसाहत,अकिवाट" या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. मान्यवरांचे स्वागत शालेय कमानीपासून ते व्यासपीठापर्यंत लेझीम व पुष्पवृष्टीकरून करण्यात आले. कार्यक्रमास सावीत्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन, लोकनियुक्त सरपंच सौ. वंदना पाटील यांनी केले तर युवा नेते सुहास पाटील यांनी श्रीफळ वाढविले.माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरगदार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, रिमिक्स गाणे,लावणी,मनोरा,नाटक व नृत्य कला सादरीकरण करून प्रेक्षकांचे व्वा व्वा मिळवीले.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक पितांबर खंडागळे सर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत व यथोचित सत्कार करून आपल्या शाळेत राबविण्यात आलेले शालेय उपक्रम तसेच स्नेहसम्मेलनाची आवश्यकता, शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये पाच विद्यार्थ्यी चमकलेचे सांगितले.व यापुढे शालेय गुणवत्ता वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास नुतन तंटामुक्त समिती अध्यक्ष -राजेंद्र चौगुले, उपसरपंच -रत्ना सावंत, सदस्य -सलमान बैरगदार,जाफरूली तहसीलदार,रेखा कांबळे, श्रीराम हुजरे,शितल हळिंगळे, सुनिता माने, सुजाता बडबडे, अमोल माने,माधूरी तळवार, प्रकाश रायनाडे,अनिता उगारे,कमल ज्योती, आप्पासो म्हैशाळे, अश्विनी कोळी, कुमार तवंदकर, जेष्ठ पत्रकार -गणपती कागे,अजित कल्लण्णावर, ॲड.बी.आर कुंभार, माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक काशीद ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा संगिता पाणदारे,उपाध्यक्ष-शांतीनाथ पाटील तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांचे प्रमुख उपस्थिती हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या आनंदात पार पडला.

यावेळी नुतन तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी राजेंद्र चौगुले यांची निवड झालेबद्दल, सुरज बेरड यांची वरिष्ठ तंत्रज्ञ पदी पद्दोनित्ती झाले बद्दल व कोरीओग्रफी उत्कृष्ट काम केले बद्दल  सीमा मगदूम, कोमल मिठारे , विकी बेरड यांचा विशेष सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी सहा. अध्यापक वसीम इकबाल अत्तार सर, केंद्रातील सर्व शाळांचे  मुख्याध्यापक व अध्यापक तसेच शालेय मदतनीस साधना नाईक व त्यांचे पुतणे अक्षय नाईक व मित्रपरिवार यांनी सुद्धा बहुमोल सहकार्य केलेबद्दल त्यांचे शाळा व  सर्व ग्रामस्थांकडून विशेष कौतुक व हार्दिक अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे उठावदार सूत्रसंचालन अशोक कोळी सर व विद्यासागर उळागड्डे सर यांनी केले.एकंदरीत कार्यक्रमाचे नेटके व उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल अकिवाट परिसरातून शाळेचे कौतुक होत आहे.शाळेसाठी नेहमीच सहकार्य करणाऱ्या पालक वर्ग,प्रतिष्ठित नागरिक व सर्व हितचिंतक यांचेही सर्वत्र खास कौतुक होत आहे. सदर कार्यक्रमाची सांगता   अध्यापक श्री.जयवंत नाईक सर यांनी सर्व उपस्थितांचे शब्दसुमनाने आभार मानून केली.

No comments