ऋषिकेश आनंद महाराज यांचा पिठाभिषेक सोहळा धार्मिक वैदिक पद्धतीने उत्साहात संपन्न
जेडी न्यूज नेटवर्क सौ मंदा देशपांडे
दत्तवाड येथील सदगुरू बाबा महाराज मठाच्या ऋषिकेशनंद महाराज यांच्या पिठाभिषेक कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजन होम हवन धार्मिक कार्यक्रम व ध्वजारोहण झाली यावेळी श्री ज अदृश्यकाड सिद्धेश्वर महास्वामीजी, श्री शृ डॉ पालाश शिव योगेश्वर, श्री श्रो ब्र चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी हुक्केरी, राजेंद्र पाटील यड्रावकर ,करण सिंग घोरपडे हे प्रमुख उपस्थित होते
सद्गगुरु बाबा महाराज मठाच्या पिठाभिषेक कार्यक्रमाची सुरुवात धार्मिक वातावरणात व संत प्रवचनात झाली चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी श्री जगदृश्य काड सिद्धेश्वर महास्वामीजी यांनी भारतात असलेल्या पुरातन संत परंपरेचा उल्लेख करून याची जगाला गरज असल्याचे प्रतिपादन केले दतवाड येथे असलेल्या बाबा महाराजांच्या मठाचे वैशिष्ट्य गृहस्था आश्रमात राहून समाजाला ज्ञानोपासना करण्याचे काम या मठात होते त्यामुळे येथील परंपरा श्रेष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले.
गावातील प्रमुख मार्गावरून अनेक वाजंत्री रथ घोड्याच्या लवाजमासह मिरवणुकीने गावातील वातावरण धार्मिक बनले यावेळी प्रमुख मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती. भजन कीर्तन प्रवचन यामुळे येथे धार्मिक वातावरण बनले आहे दिनांक २६ रोजी पहाटे पिठाभिषेक कार्यक्रमाचा मुख्य धार्मिक सोहळा मुख्य मठामध्ये पंडित डॉ महांतेश शास्त्रीजी यांच्या विधीयुक्त वैदिक संस्कारात पार पडला कार्यक्रमास शिवानंद भारती महास्वामीजी इचल पंचम विश्व लिंगेश्वर महास्वामीजी नीडसोशी दयानंद सरस्वती महास्वामीजी पूर्णानंद आश्रम आलमप्रभुजी महास्वामीजी चिदानंद महास्वामीजी सिद्धारूढ शरणारू रामण्णा शरणारू बेनवाड अभिनव सिद्धारूढ महास्वामीजी मातोश्री ललिताम्मा माताजी या स्वामींनी भेट देऊन आशीर्वचन दिले तर आ राजेंद्र पाटील यड्रावकर राजू शेट्टी उल्हास पाटील पी एम पाटील माधवराव घाटगे यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट देऊन शुभाशीर्वाद घेतले यावेळी कर्नाटक महाराष्ट्रातील मठाचे भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
No comments